Ad will apear here
Next
समृद्धी इंडिया अॅॅग्री अॅवॉर्ड्स सोहळ्याचे दिल्लीत आयोजन

नवी दिल्ली : शेतीमध्ये लक्षणीय प्रगती करणारे शेतकरी व संस्था यांना देण्यात येणाऱ्या महिंद्रा समृद्धी इंडिया अॅग्री अॅवॉर्ड्सचा वितरण सोहळा येत्या १८ मार्च रोजी, नवी दिल्ली येथे होणार आहे. यंदाचे पुरस्कारांचे हे नववे वर्ष आहे. नावीन्यपूर्ण शेती तंत्रज्ञानाद्वारे शेतीची उत्पादकता वाढवून ग्रामीण भागात भरभराट आणण्याच्या उद्देशाने कार्यरत असलेल्या महिंद्राच्या समृद्धी उपक्रमाअंतर्गत हे पुरस्कार देण्यात येतात.   

या पुरस्कारांच्या निमित्ताने, २०१७ मध्ये जाहीर करण्यात आलेल्या ‘फार्मिंग 3.0’ बद्दलची कंपनीची बांधिलकीही अधोरेखित होणार आहे. उत्पादकता व अर्थकारण आणि सामाजिक व पर्यावरणीय घटक यांचा समतोल साधतील, अशा उपक्रमांद्वारे शेती शाश्वत बनवणे हे ‘फार्मिंग 3.0’ चे उद्दिष्ट आहे. गेल्या काही वर्षांत या पुरस्कारांना मिळणाऱ्या प्रतिसादामध्ये व सहभागींमध्ये वाढ होत आहे. या पुरस्कारांसाठी शेतकरी व बिगर-शेतकरी श्रेणींतून देशभरातून ६३ हजार ७५८ अर्ज आले असून, गेल्या वर्षी ही संख्या ६२ हजार ९१६ होती.

महिंद्रा समृद्धी इंडिया अॅग्री अॅवॉर्ड्समध्ये महिंद्रा समृद्धी कृषक सम्राट सन्मान, कृषी प्रेरणा सन्मान, कृषी युवा सन्मान, कृषी सम्राट सन्मान, कृषी संस्था सन्मान, कृषी शिक्षण सन्मान, कृषी विज्ञान केंद्र सन्मान, कृषी सहयोग सन्मान, कृषी शिरोमणी सन्मान हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. 
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/QZRDBY
Similar Posts
‘ग्रामीण भागातील कुटुंबांना वार्षिक १८ हजार रुपये द्यावेत’ नवी दिल्ली : शेतीशी निगडीत गंभीर प्रश्न सोडविण्यासाठी माजी मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमणीयन यांनी प्रत्येक ग्रामीण कुटुंबाला अर्ध-सार्वत्रिक मूलभूत ग्रामीण उत्पन्न म्हणून दर वर्षी १८ हजार रुपये द्यावेत. यातून जे खरेच आर्थिकदृष्ट्या संपन्न असतील त्यांना वगळावे. असा प्रस्ताव एका शोधनिबंधाद्वारे मांडला आहे
आनंद महिंद्रांनी शब्द पाळला! कार्यालयातून प्लास्टिक बाटल्या हद्दपार! नवी दिल्ली : उद्योजक आनंद महिंद्रा यांनी आपल्या कार्यालयातील प्लास्टिकच्या बाटल्यांचा वापर बंद करून स्टील आणि तांब्याच्या बाटल्यांचा वापर सुरू केला आहे. नुकताच त्यांनी या बाटल्यांचा फोटो ट्विट करून या बदलाची माहिती सर्वांना दिली. जुलैमध्ये संचालक मंडळाच्या एका बैठकीचा फोटो त्यांनी ट्विट केला होता. त्या
शेतीमाल विक्रीसाठी ‘ई-रकम’ पोर्टल नवी दिल्ली : शेतकऱ्यांना आपल्या शेतीमालाची ऑनलाइन विक्री करता यावी, यासाठी केंद्र सरकारने ‘एमएसटीसी’ या आपल्या उपक्रमांतर्गत ‘ई-रकम’ हे पोर्टल सुरू केले आहे. शेतीमालाच्या लिलावासाठी हे आधुनिक व्यासपीठ खुले झाल्याने शेतकऱ्यांना नक्कीच फायदा होणार आहे. त्याच्या अंमलबजावणीत काही आव्हाने असली, तरी दीर्घकालीन
‘कमी पाऊस होऊनही शेतीतील गुंतवणुकीमुळे उत्पादकता वाढली’ मुंबई : राज्यात गेल्या वर्षी पाऊस कमी होऊनही उत्पादकता ११५ लाख मेट्रिक टन झाली. शेतीतील गेल्या साडेचार वर्षांतील गुंतवणूक आणि जलसंधारणाच्या कामांचे हे यश आहे. या वर्षीच्या खरीप हंगामासाठी आवश्यकतेपेक्षा अधिक बि-बियाणे आणि खतांचा मुबलक साठा उपलब्ध आहे. शेतकऱ्यांना वेळेवर आणि पुरेसा पीक कर्ज पुरवठा करण्याच्या सूचना बँकांना केल्या आहेत

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language